कधी सांज वेळी ... - सांज गारवा

Kovalam Beach, Kerala


कधी सांज वेळी, मला आठवूनि,
तुझ्या भोवताली, जराशी वळूनि,
पाहशील का ?

तुझा दूर येथे, उठू दे शहारा,
शरीरावरूनि, जसा गार वारा,
वाहशील का ?

रिते सूर आता, इथे या उराशी,
जरा सोबतीला, मनाच्या तळाशी,
राहशील का ?

तुझ्या आठवांना, इथे साहतो मी,
तुला साहतो मी, तशी तू मलाही,
साहशील का ?

कधी सांज वेळी, मला आठवूनि...

गायक - मिलिंद इंगळे

Comments

Popular posts from this blog

माझिया मना ... - ऋतु हिरवा

जीव रंगला ... - जोगवा

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट