Posts

Showing posts from November, 2017

सूर निरागस हो, गणपती ...

सदासर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा  । उपेक्षू नको गूणवंता अनंता, रघूनायका मागणे हेचि आता     ।। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे । मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही       ।। सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो, शुभनयना, करुणामय, गौरीहर, श्रीवरदविनायक, ओंकार, गणपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती, लीन निरंतर हो, सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, गजवदना तू सुखकर्ता, गजवदना तू दु:खहर्ता गजवदना मोरया, मोरया सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो                         ।। धृ ।। सूर-सुमनांनी भरली ओंजळ, नित्य रिती व्हावी चरणांवर तान्हे बालक सुमधुर हासे, भाव तसे वाहो सूरांतून ओंकार, गणपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती, सूरपती, लीन निरंतर हो, सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो                   ...

नंद किशोरा, चित्त चकोरा ...

कान्हा, ओ कान्हा, कान्हा रे, कान्हा, नंद किशोरा, चित्त चकोरा, गोकुळतारा, मनमोहन तू बावरी राधा, मी बृजबाला, प्रेमरसाची, ओढ जीवाला ओ, कृष्ण-कन्हैय्या अशी लावीसी तू कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा               ।। धृ ।। वृंदावनी, गोप-गौळणी, घेऊनिया धुंद रास खेळसी तू पानांतूनी वेलींतूनी, बासरीचे गोड सूर छेडिसी तू त्याच सूरांनी मोहूनि गेले, पाहूनि तुजला, मी तुझी झाले वेड मनाला असे लाविसी तू                                               ।। १ ।। राधा तुझी, मीरा तुझी, होईन मी श्याम तुझी दासी रे प्रीती अशी, भक्ती अशी, लाभली ही आज मधुमासी रे तूच मुकुंदा, माधव माझा, मुग्ध मनाचा, श्रीहरी राजा लोचनी माझ्या असा राहसी तू             ...

मी डोलकर दर्याचा राज़ा (वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा)

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा                    - कोरस मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राज़ा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा                  ।। धृ ।। आय बापाची लाराची लेक मी लारी चोली पिवली गो नेसलय अंजिरी सारी माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा वास परमाळता वार्‍यान घेतय झेपा नथ नाकान साजिरवानी गला भरुन सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गो रानी रात पुनवेला नाचून करतय मौजा                     ।। १ ।। या गो दर्याचा दरारा मोठा कवा पान्यावरी उठतान डोंगर लाटा कवा उदानवारा शिराला येतय फारु कवा पान्यातूनी आभाला भिरतंय तारु वाट बगून झुरते पिरती मंग दर्याला येते भरती जाते पान्यान भिजून धरती येते भेटाया तसाच भरतार माजा                    ...