कांदेपोहे ... - सनई चौघडे
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी,
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन् कांती,
आयुष्य हे चुलिवरल्या कढईतले कांदेपोहे.
नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी,
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्मांच्या गाठी,
रोज नटावे रोज सजावे धरुन आशा खोटी,
पाने मिटूनी लाजाळूपरि पुन्हा उघडण्यासाठी,
आयुष्य हे...
दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना,
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी-मनी नसताना,
नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना,
अन् मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पाहताना.
आयुष्य हे...
भूतकाळच्या धुऊन अक्षता तांदूळ केले ज्यांनी,
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी,
भविष्य आता रंगविण्याचा अट्टाहासही त्यांचा,
हातावरल्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी.

Comments
Post a Comment