नसतेस घरी तू जेव्हा ... - आयुष्यावर बोलू काही

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो.

नसतेस घरी तू जेव्हा ...

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ असा ओढवतो,
ही धरा दिशाहीन होते, अन् चंद्र पोरका होतो.

नसतेस घरी तू जेव्हा ...

येतात ऊन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो.

नसतेस घरी तू जेव्हा ...

तव मिठीत विरघणाऱ्‍या, मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो.

नसतेस घरी तू जेव्हा ...

तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा,
समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो.

नसतेस घरी तू जेव्हा ...

ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनि झालो,
तुज वाचुन उमगत जाते, तुज वाचुन जन्मच अडतो.

नसतेस घरी तू जेव्हा ...



शब्द - संदीप खरे ...
संगीत आणि गायक - डॉ. सलील कुलकर्णी ...

Comments

Popular posts from this blog

माझिया मना ... - ऋतु हिरवा

जीव रंगला ... - जोगवा

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट