Posts

Showing posts from 2009

सागरास... ... ... - विनायक दामोदर सावरकर

ने मजसी ने, परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला, सागरा, ने मजसी ने . भूमातेच्या, चरणतला तूज धूता, मी नित्य पाहिला होता, मज वदलासी, अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू, तई जननीहृद् , विरहशंकितही झाले, परि तुवा, वचन तिज दिधले, मार्गज्ञ स्वये, मीच पृष्ठी वाहीन, त्वरितया, परत आणीन, विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी, परि अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथून सोडिले तिजला, सागरा प्राण तळमळला, तळमळला, सागरा, ने मजसी ने ...