Posts

Showing posts from May, 2010

जीव रंगला ... - जोगवा

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू . जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू . पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू . सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू . जीव दंगला ... चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू . खुळं आभाळ ढगाळ, त्याला रूढीचा इटाळ, माझ्या लाख सजणा, ही काकणाची तोड माळ तू . खूण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण, तुझ्या पायावं माखेल माझ्या जन्माचं गोंदण . जीव दंगला ...

जगण्याच्या वारीत मिळेना वाट ... - झेंडा

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती गीतः अरविंद जगताप. संगीतः अवधूत गुप्ते. गायकः ज्ञानेश्वर मेश्राम. चित्रपटः झेंडा (२०१०) जगण्याच्या वारीत मिळेना वाट, साचले मोहाचे धुके घनदाट, आपली मानसं, आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरांस भीती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||धॄ|| आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता, पुरे झाली आता, उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता, उजळावा दिवा म्हणुनिया किती, मुक्या बिचार्‍या जळती वाती, वैरी कोण आहे, इथे कोण साथी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||१|| बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं, उभ्या उभ्या संपुन जाई, खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपण हितं शेत खाई, भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे, येगळ्या जाती, सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||२||

खेळ मांडला ... - नटरंग

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई, साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई ; तरी देवा सरंना ह्यो भोग कशापायी, हरवली वाट दिशा अंधारल्या दाही ; ववाळुनी ऊधळतो जीव मायबापा, वनवा ह्यो उरी पेटला... खेळ मांडला . सांडली गा रीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखीव गा खेळ मांडला ; दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्‍हा हुबा, ह्यो तुझ्याच ऊंबऱ्‍यात खेळ मांडला . उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई, भेगाळल्या भुईपरी जीनं, अंगार जीवाला जाळी ; बळ देई झुंजायाला किरपेची ढाल दे, ईनवीती पंचप्रान जिव्हारात ताल दे ; करपलं रान देवा जळलं शीवार, तरी न्हाई धीर सांडला... खेळ मांडला .

नदीच्या पल्याड आईचा गोंधुळ ... जोगवा

नदीच्या पल्याड आईचा गोंधुळ, डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर घालू जागर जागर डोंगर माथ्याला. घे ललाटी भंडार, दूर लोटून दे अंधार, आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार. नदीच्या पान्यावर आगीन फुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं, नाद आला गं आला गं जिवाच्या घुंगराला. नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू, हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्‍हावं तू, देवी माझ्या अंतरी ऱ्‍हावं तू, कामक्रोध परतुनी लाव तू, कामक्रोध परतुनी लाव तू , देवी माझी पार कर नाव तू. डोळा भरून तुझी मूरत पाहीन, मूरत पाहीन, तुझा महिमा गाईन, महिमा गाईन तुला घुगऱ्‍या वाहीन, घुगऱ्‍या वाहीन तुझा भंडारा वाहीन, दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला, यलम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर, निविदाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं, हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं, मायेचा पाझर, आई तुझा मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर. खणानारळानं ओटी मी भरीन, ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन, सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन देव्हारा धरीन,माझी ओंजळ भरीन, आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला.