सांज ये गोकुळी ... - ऋतु हिरवा

किहीम, अलीबाग
सांज ये गोकुळी, सावळी सावळी,
सावळ्याची जणू सावली.                ।। धृ  ।।

धूळ उडवीत गायी निघाल्या,
शाम रंगात वाटा बुडाल्या,
परतती त्यासवे, पाखरांचे थवे,
पैलघंटा घुमे राऊळी.                     ।। १ ।।


पर्वतांची दिसे दूर रांग,
काजळाची जणू दाट रेघ,
होई डोहातले, चांदणे सावळे,
भोवती सावळ्या चाहूली.                 ।। २ ।।


माऊली सांज अंधार पान्हा,
विश्व सारे जणू होय कान्हा,
मंद वाऱ्यावरी, वाहते बासरी,
अमृताच्या जणू ओंजळी.                 ।। ३ ।।


शब्द : सुधीर मोघे
स्वर : आशा भोसले
अल्बम : ऋतु हिरवा / वजीर
संगीत : श्रीधर फडके

official video link : https://www.youtube.com/watch?v=Gzt4c8lZj0E

Comments

Popular posts from this blog

माझिया मना ... - ऋतु हिरवा

जीव रंगला ... - जोगवा

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट