Posts

Showing posts from June, 2010

ब्रेक अप के बाद - अभिषेक खाणकर

एकटी तू एकटा मी, ना घेतले कोणी समजुनि, फिके वाटे जग सारे, जेव्हा येती साऱ्या आठवणी, तरी तुला, पाहतो मी, पुन्हा पुन्हा, माझ्या मनी. ब्रेक-अप के बाद । ( - काय रे ए, हा एवढा बारीक कसा झाला रे ? - अरे ए, याचा ब्रेक अप झालाय ! - हॉ, मला वाटलं कोणी गोळी दिली ! - आई ***.) आई मला विचारते, हल्ली जेवत तू का नाही माझ्या बाळा, आई तुला काय सांगू, तुझ्या पोराला हा लागलाय प्रेमचाळा, ( - हात काढ) म्हणून आता पाळतो मी, पुन्हा पुन्हा एकादशी, ( - आई, मी करतो पूजा) ब्रेक-अप के बाद । ( - काय रे ए, देवधर्म कधीपासून ? - नाही बाबा असंच ) ब्रेक-अप के बाद । ( - अरे डूड, जरा बाईक देना ! - कशाला ? - गर्लफ्रेंडला सोडायला जायचंय. - चल भाग ! - इन्सल्ट काय करतोस ! गर्लफ्रेंडे माझ्याकडे, लुख्खा. ) टूटी फूटी जिंदगी ही, तुझं मन आणि आपला खिसा खाली, प्रेमाची ही लॉटरी साली, लागली तरी ठरलो मी भिकारी, तरी पुन्हा, खेळतो मी, पुन्हा पुन्हा, पुन्हा रमी. ( - हल्ली बदामचं पानंच येत नाही यार ) ब्रेक अप के बाद । ( - आई ***. ती बघ, ए, पारो. - मत हात लगाओ मुझे । - ए देवदास ) नाका सारा सूना सूना, वाटतो हा मला भरलेला असताना, नाक्यावरची ...

कधी सांज वेळी ... - सांज गारवा

Image
Kovalam Beach, Kerala कधी सांज वेळी, मला आठवूनि, तुझ्या भोवताली, जराशी वळूनि, पाहशील का ? तुझा दूर येथे, उठू दे शहारा, शरीरावरूनि, जसा गार वारा, वाहशील का ? रिते सूर आता, इथे या उराशी, जरा सोबतीला, मनाच्या तळाशी, राहशील का ? तुझ्या आठवांना, इथे साहतो मी, तुला साहतो मी, तशी तू मलाही, साहशील का ? कधी सांज वेळी, मला आठवूनि... गायक - मिलिंद इंगळे

नसतेस घरी तू जेव्हा ... - आयुष्यावर बोलू काही

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा ... नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ असा ओढवतो, ही धरा दिशाहीन होते, अन् चंद्र पोरका होतो. नसतेस घरी तू जेव्हा ... येतात ऊन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे, खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो. नसतेस घरी तू जेव्हा ... तव मिठीत विरघणाऱ्‍या, मज स्मरती लाघव वेळा, श्वासाविन हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो. नसतेस घरी तू जेव्हा ... तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा, समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो. नसतेस घरी तू जेव्हा ... ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनि झालो, तुज वाचुन उमगत जाते, तुज वाचुन जन्मच अडतो. नसतेस घरी तू जेव्हा ... शब्द - संदीप खरे ... संगीत आणि गायक - डॉ. सलील कुलकर्णी ...

भय इथले संपत नाही ... - महाश्वेता (शीर्षकगीत) / मैत्र जीवाचे

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. भय इथले संपत नाही ... ते झरे चंद्र सजणा जे, ही धरती भगवी माया, झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया. भय इथले संपत नाही ... तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शूनि गेला, सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला. भय इथले संपत नाही ... स्तोत्रात इंद्रीये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. भय इथले संपत नाही ... कवि - ग्रेस गायिका - लता मंगेशकर महाश्वेता (शीर्षकगीत) / मैत्र जीवाचे

सांज ये गोकुळी ... - ऋतु हिरवा

Image
किहीम, अलीबाग सांज ये गोकुळी, सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली.                ।। धृ  ।। धूळ उडवीत गायी निघाल्या, शाम रंगात वाटा बुडाल्या, परतती त्यासवे, पाखरांचे थवे, पैलघंटा घुमे राऊळी.                     ।। १ ।। पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ, होई डोहातले, चांदणे सावळे, भोवती सावळ्या चाहूली.                 ।। २ ।। माऊली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा, मंद वाऱ्यावरी, वाहते बासरी, अमृताच्या जणू ओंजळी.                 ।। ३ ।। शब्द : सुधीर मोघे स्वर : आशा भोसले अल्बम : ऋतु हिरवा / वजीर संगीत : श्रीधर फडके official video link : https://www.youtube.com/watch?v=Gzt4c8lZj0E

माझिया मना ... - ऋतु हिरवा

माझिया मना, जरा थांब ना. पाऊली तुझ्या, माझिया खूणा. तुझे धावणे अन् , मला वेदना. माझिया मना ... माझिया मना, जरा बोल ना. ओळखू कसे मी, हे तुझे ऋतु ? एकटी न मी, सोबतीस तू. ओळखू कशा मी, तुझ्या भावना ? माझिया मना ... माझिया मना, जरा ऐक ना. सांज वेळ ही, तुझे चालणे. रात्र ही सुनी, तुझे बोलणे. उषःकाल आहे, नवी कल्पना. माझिया मना ...

धुंद होते शब्द सारे ... - उत्तरायण

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, वाऱ्‍यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना. सईये, रमुनी साऱ्या या जगात रिक्त व्हावं असे परि, कैसे गुंफू गीत हे. धुंद होते शब्द सारे. मेघ दाटूनि, गंध लहरूनि, बरसला मल्हार हा. चांद राती, भाव गुंतूनि, बहरला निशिगंध हा. का कळेना काय झाले, भास की आभास सारे, जीवनाचा गंध हा विश्रांत हा, शांत हा. धुंद होते शब्द सारे, धुंद होते भाव सारे, सईये, रमुनी साऱ्या या जगात रिक्त व्हावं असे परि, कैसे गुंफू गीत हे. धुंद होते शब्द सारे... चित्रपट : उत्तरायण शब्द : संगीत : स्वर :

कांदेपोहे ... - सनई चौघडे

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन् कांती, आयुष्य हे चुलिवरल्या कढईतले कांदेपोहे. नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी, आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्मांच्या गाठी, रोज नटावे रोज सजावे धरुन आशा खोटी, पाने मिटूनी लाजाळूपरि पुन्हा उघडण्यासाठी, आयुष्य हे... दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना, कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी-मनी नसताना, नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना, अन् मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पाहताना. आयुष्य हे... भूतकाळच्या धुऊन अक्षता तांदूळ केले ज्यांनी, आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी, भविष्य आता रंगविण्याचा अट्टाहासही त्यांचा, हातावरल्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी. आयुष्य हे...