धुंद होते शब्द सारे ... - उत्तरायण

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना,
वाऱ्‍यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना.
सईये, रमुनी साऱ्या या जगात रिक्त व्हावं असे परि,
कैसे गुंफू गीत हे.
धुंद होते शब्द सारे.

मेघ दाटूनि, गंध लहरूनि, बरसला मल्हार हा.
चांद राती, भाव गुंतूनि, बहरला निशिगंध हा.
का कळेना काय झाले,
भास की आभास सारे,
जीवनाचा गंध हा विश्रांत हा,
शांत हा.

धुंद होते शब्द सारे,
धुंद होते भाव सारे,
सईये, रमुनी साऱ्या या जगात रिक्त व्हावं असे परि,
कैसे गुंफू गीत हे.
धुंद होते शब्द सारे...

चित्रपट : उत्तरायण
शब्द :
संगीत :
स्वर :

Comments

Popular posts from this blog

माझिया मना ... - ऋतु हिरवा

जीव रंगला ... - जोगवा

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट