भय इथले संपत नाही ... - महाश्वेता (शीर्षकगीत) / मैत्र जीवाचे

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते.

भय इथले संपत नाही ...

ते झरे चंद्र सजणा जे, ही धरती भगवी माया,
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया.

भय इथले संपत नाही ...

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शूनि गेला,
सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला.

भय इथले संपत नाही ...

स्तोत्रात इंद्रीये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे,
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे.

भय इथले संपत नाही ...



कवि - ग्रेस
गायिका - लता मंगेशकर
महाश्वेता (शीर्षकगीत) / मैत्र जीवाचे

Comments

Popular posts from this blog

माझिया मना ... - ऋतु हिरवा

जीव रंगला ... - जोगवा

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट