खेळ मांडला ... - नटरंग

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई, साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई ;
तरी देवा सरंना ह्यो भोग कशापायी, हरवली वाट दिशा अंधारल्या दाही ;
ववाळुनी ऊधळतो जीव मायबापा, वनवा ह्यो उरी पेटला... खेळ मांडला .
सांडली गा रीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखीव गा खेळ मांडला ;
दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्‍हा हुबा, ह्यो तुझ्याच ऊंबऱ्‍यात खेळ मांडला .
उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई, भेगाळल्या भुईपरी जीनं, अंगार जीवाला जाळी ;
बळ देई झुंजायाला किरपेची ढाल दे, ईनवीती पंचप्रान जिव्हारात ताल दे ;
करपलं रान देवा जळलं शीवार, तरी न्हाई धीर सांडला... खेळ मांडला .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझिया मना ... - ऋतु हिरवा

जीव रंगला ... - जोगवा

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट