नदीच्या पल्याड आईचा गोंधुळ ... जोगवा

नदीच्या पल्याड आईचा गोंधुळ, डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालू जागर जागर डोंगर माथ्याला.
घे ललाटी भंडार, दूर लोटून दे अंधार,
आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार.
नदीच्या पान्यावर आगीन फुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं,
नाद आला गं आला गं जिवाच्या घुंगराला.

नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू,
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्‍हावं तू,
देवी माझ्या अंतरी ऱ्‍हावं तू, कामक्रोध परतुनी लाव तू,
कामक्रोध परतुनी लाव तू , देवी माझी पार कर नाव तू.
डोळा भरून तुझी मूरत पाहीन, मूरत पाहीन, तुझा महिमा गाईन,
महिमा गाईन तुला घुगऱ्‍या वाहीन, घुगऱ्‍या वाहीन तुझा भंडारा वाहीन,
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला,

यलम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर,
निविदाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं,
हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं, मायेचा पाझर,
आई तुझा मायेचा पाझर, सागर ह्यो,
भक्तीचा सागर.
खणानारळानं ओटी मी भरीन, ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन,
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन देव्हारा धरीन,माझी ओंजळ भरीन,
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुंद होते शब्द सारे ... - उत्तरायण

नसतेस घरी तू जेव्हा ... - आयुष्यावर बोलू काही

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट