जगण्याच्या वारीत मिळेना वाट ... - झेंडा
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
गीतः अरविंद जगताप.
संगीतः अवधूत गुप्ते.
गायकः ज्ञानेश्वर मेश्राम.
चित्रपटः झेंडा (२०१०)
जगण्याच्या वारीत मिळेना वाट, साचले मोहाचे धुके घनदाट,
आपली मानसं, आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरांस भीती,
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||धॄ||
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता, उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनिया किती, मुक्या बिचार्या जळती वाती,
वैरी कोण आहे, इथे कोण साथी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||१||
बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं, उभ्या उभ्या संपुन जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपण हितं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे, येगळ्या जाती,
सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||२||

Comments
Post a Comment