नंद किशोरा, चित्त चकोरा ...
कान्हा, ओ कान्हा, कान्हा रे, कान्हा,
नंद किशोरा, चित्त चकोरा, गोकुळतारा, मनमोहन तू
बावरी राधा, मी बृजबाला, प्रेमरसाची, ओढ जीवाला
ओ, कृष्ण-कन्हैय्या अशी लावीसी तू
कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा ।। धृ ।।
वृंदावनी, गोप-गौळणी, घेऊनिया धुंद रास खेळसी तू
पानांतूनी वेलींतूनी, बासरीचे गोड सूर छेडिसी तू
त्याच सूरांनी मोहूनि गेले, पाहूनि तुजला, मी तुझी झाले
वेड मनाला असे लाविसी तू ।। १ ।।
राधा तुझी, मीरा तुझी, होईन मी श्याम तुझी दासी रे
प्रीती अशी, भक्ती अशी, लाभली ही आज मधुमासी रे
तूच मुकुंदा, माधव माझा, मुग्ध मनाचा, श्रीहरी राजा
लोचनी माझ्या असा राहसी तू ।। २ ।।
चित्रपट : माझा पती करोडपती
शब्द : शांताराम नांदगावकर
संगीत : अरुण पौडवाल
स्वर : अनुराधा पौडवाल
video link : https://www.youtube.com/watch?v=qzmHZep7hw0

Comments
Post a Comment