Posts

सूर निरागस हो, गणपती ...

सदासर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा  । उपेक्षू नको गूणवंता अनंता, रघूनायका मागणे हेचि आता     ।। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे । मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही       ।। सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो, शुभनयना, करुणामय, गौरीहर, श्रीवरदविनायक, ओंकार, गणपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती, लीन निरंतर हो, सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, गजवदना तू सुखकर्ता, गजवदना तू दु:खहर्ता गजवदना मोरया, मोरया सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो                         ।। धृ ।। सूर-सुमनांनी भरली ओंजळ, नित्य रिती व्हावी चरणांवर तान्हे बालक सुमधुर हासे, भाव तसे वाहो सूरांतून ओंकार, गणपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती, सूरपती, लीन निरंतर हो, सूर निरागस हो, गणपती, सूर निरागस हो                         ।। १ ।। चित्रपट : कट्यार काळजात घुसली (२०१५) शब्द : मंगेश कांगणे संगीत : शंकर-एहसान-लॉय स्वर : शंकर महादेवन official video link

नंद किशोरा, चित्त चकोरा ...

कान्हा, ओ कान्हा, कान्हा रे, कान्हा, नंद किशोरा, चित्त चकोरा, गोकुळतारा, मनमोहन तू बावरी राधा, मी बृजबाला, प्रेमरसाची, ओढ जीवाला ओ, कृष्ण-कन्हैय्या अशी लावीसी तू कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा               ।। धृ ।। वृंदावनी, गोप-गौळणी, घेऊनिया धुंद रास खेळसी तू पानांतूनी वेलींतूनी, बासरीचे गोड सूर छेडिसी तू त्याच सूरांनी मोहूनि गेले, पाहूनि तुजला, मी तुझी झाले वेड मनाला असे लाविसी तू                                               ।। १ ।। राधा तुझी, मीरा तुझी, होईन मी श्याम तुझी दासी रे प्रीती अशी, भक्ती अशी, लाभली ही आज मधुमासी रे तूच मुकुंदा, माधव माझा, मुग्ध मनाचा, श्रीहरी राजा लोचनी माझ्या असा राहसी तू                                           ।। २ ।। चित्रपट : माझा पती करोडपती शब्द : शांताराम नांदगावकर संगीत : अरुण पौडवाल स्वर : अनुराधा पौडवाल video link : https://www.youtube.com/watch?v=qzmHZep7hw0

मी डोलकर दर्याचा राज़ा (वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा)

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा                    - कोरस मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राज़ा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा                  ।। धृ ।। आय बापाची लाराची लेक मी लारी चोली पिवली गो नेसलय अंजिरी सारी माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा वास परमाळता वार्‍यान घेतय झेपा नथ नाकान साजिरवानी गला भरुन सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गो रानी रात पुनवेला नाचून करतय मौजा                     ।। १ ।। या गो दर्याचा दरारा मोठा कवा पान्यावरी उठतान डोंगर लाटा कवा उदानवारा शिराला येतय फारु कवा पान्यातूनी आभाला भिरतंय तारु वाट बगून झुरते पिरती मंग दर्याला येते भरती जाते पान्यान भिजून धरती येते भेटाया तसाच भरतार माजा                      ।। २ ।। भल्या सकालला आभाल झुकतंय हे खाली सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली आमी पान्यामंदी रापण टाकतो जाली  धन दर्याचं लुटून भरातो डाली रात पुनवेचं चांदन प्याली कशी चांदीची मासोली झाली माज्या जाल्यात होऊन आली नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा                     ।। ३ ।। शब्द : शांत शेळके संगीत : हृदयनाथ मंगेशकर स्वर : लता मंगेशकर व हेम

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट

Image
Manu ! मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं, जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलते गं ।।धृ।। झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं, हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं ।।१।। अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं, अजून तुझ्या डोळ्यांतील मोठेपण कवळे गं ।।२।। गीत : सुरेश भट संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर : लता मंगेशकर

ब्रेक अप के बाद - अभिषेक खाणकर

एकटी तू एकटा मी, ना घेतले कोणी समजुनि, फिके वाटे जग सारे, जेव्हा येती साऱ्या आठवणी, तरी तुला, पाहतो मी, पुन्हा पुन्हा, माझ्या मनी. ब्रेक-अप के बाद । ( - काय रे ए, हा एवढा बारीक कसा झाला रे ? - अरे ए, याचा ब्रेक अप झालाय ! - हॉ, मला वाटलं कोणी गोळी दिली ! - आई ***.) आई मला विचारते, हल्ली जेवत तू का नाही माझ्या बाळा, आई तुला काय सांगू, तुझ्या पोराला हा लागलाय प्रेमचाळा, ( - हात काढ) म्हणून आता पाळतो मी, पुन्हा पुन्हा एकादशी, ( - आई, मी करतो पूजा) ब्रेक-अप के बाद । ( - काय रे ए, देवधर्म कधीपासून ? - नाही बाबा असंच ) ब्रेक-अप के बाद । ( - अरे डूड, जरा बाईक देना ! - कशाला ? - गर्लफ्रेंडला सोडायला जायचंय. - चल भाग ! - इन्सल्ट काय करतोस ! गर्लफ्रेंडे माझ्याकडे, लुख्खा. ) टूटी फूटी जिंदगी ही, तुझं मन आणि आपला खिसा खाली, प्रेमाची ही लॉटरी साली, लागली तरी ठरलो मी भिकारी, तरी पुन्हा, खेळतो मी, पुन्हा पुन्हा, पुन्हा रमी. ( - हल्ली बदामचं पानंच येत नाही यार ) ब्रेक अप के बाद । ( - आई ***. ती बघ, ए, पारो. - मत हात लगाओ मुझे । - ए देवदास ) नाका सारा सूना सूना, वाटतो हा मला भरलेला असताना, नाक्यावरची

कधी सांज वेळी ... - सांज गारवा

Image
Kovalam Beach, Kerala कधी सांज वेळी, मला आठवूनि, तुझ्या भोवताली, जराशी वळूनि, पाहशील का ? तुझा दूर येथे, उठू दे शहारा, शरीरावरूनि, जसा गार वारा, वाहशील का ? रिते सूर आता, इथे या उराशी, जरा सोबतीला, मनाच्या तळाशी, राहशील का ? तुझ्या आठवांना, इथे साहतो मी, तुला साहतो मी, तशी तू मलाही, साहशील का ? कधी सांज वेळी, मला आठवूनि... गायक - मिलिंद इंगळे

नसतेस घरी तू जेव्हा ... - आयुष्यावर बोलू काही

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा ... नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ असा ओढवतो, ही धरा दिशाहीन होते, अन् चंद्र पोरका होतो. नसतेस घरी तू जेव्हा ... येतात ऊन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे, खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो. नसतेस घरी तू जेव्हा ... तव मिठीत विरघणाऱ्‍या, मज स्मरती लाघव वेळा, श्वासाविन हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो. नसतेस घरी तू जेव्हा ... तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा, समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो. नसतेस घरी तू जेव्हा ... ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनि झालो, तुज वाचुन उमगत जाते, तुज वाचुन जन्मच अडतो. नसतेस घरी तू जेव्हा ... शब्द - संदीप खरे ... संगीत आणि गायक - डॉ. सलील कुलकर्णी ...